????गौण खनिज उत्खननासाठी कोणाचा आशीर्वाद?
भाग :-1
वर्धा (सचिन ओली) : राज्य चे गृह व खनिक्रम राज्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सद्या अवैधरित्या गौण खनिज उत्खननाचा सपाटा सुरू आहे. अश्यातच पिपरी मेघे हद्दीत लेआऊट ची कामे जोरदार रित्या सुरू आहे अश्यातच पिपरी मेघे ग्रामपंचायत हद्दीत मानमोडे टाऊन व रायजा टाऊन च्या नजीक नवीन लेआऊट चा विकास सुरु आहे अश्यातच या लेआऊट मधून निघणारे गौण खनीज ची प्रशासनाकडून परवानगी नसताना उत्खनन सुरू आहे.अशी माहिती सुत्रा न कडून मिळाली आहे या लेआऊट मधील गौण खनिजाची सर्रास विक्री केल्या गेली आहे तरी या कडे प्रशासनाचे दुर लक्ष आहे. लेआऊट धारकानी लेआऊट चा विकास करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व सहाय्यक आयुक्त रचनाकार विभाग ची परवानगी घेतल्यावर लेआऊट धारकांना गौण खनिज उत्खननाची परवानगी घेणे गरजेचे नाही का असा प्रश्न निर्माण होतो. या गौण खनिज उत्खननात महसूल विभागाचा लाखो चा महसूल बुडवल्या तर जात नाहीना असे दिसून येते असे असताना मागील काही दिवसा अगोदर बरसाना लेआऊट च्या बाजूला झालेल्या अवैध उत्खनन महसूल व वन विभागाच्या सर्व्हे मध्ये झाल्याचे निर्देशनात आले असता त्यांच्या वर पण काही कारवाई झाली नाही. असे असताना पिपरी येथील दौलतसिंग शाळे मागील मागे पहाडे यांनी शिव नगरी म्हणून लेआऊट टाकले असताना तेथे ही अवैध उत्खनन झाल्याचे दिसून येते.

असे असताना गौण खनिज ची वाहतूक करत आलेल्या ट्रक व ट्रॅक्टर मुळे रामदेव बाबा नगरी मधल्या रस्त्यांचे खस्ता हाल झाले आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तरी या कडे ग्रामपंचायत प्रशासन, महसूल प्रशासन, व वनविभागाने जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे दिसून येते एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शासनाचा महसूल लेआऊट धारक बुडवत असेल तर यांच्या वर दांडात्मक कारवाई व्हायला हवी!
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3261
Total views : 4945