????शेकापूर घाटातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या मालकांवर कारवाई न करता ट्रक चालकावर कारवाई.
????अल्लीपूर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन वाळू माफिया सोबत का?
????अल्लीपूर ठाणे अंतर्गत दारू सट्टयाच्या अवैध वेवसाय सर्रास सुरू?
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर घाटातून अवैध रित्या वडनेर मार्गने शिरसगाव बाजार होत अल्लीपूर ते धोत्रा मार्गे वर्धा कडे ट्रक व टिप्पर मधून वाळू ची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना साहेब का बर सोडतात याला समजायला मार्ग नाही . या प्रकारणात 16 ट्रक चालकांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली. असून गाडी मालकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल साहेबांनी केले नाही. या गाडी मालका मध्ये वर्ध्यातील सुरकार, पाटिल, हिवसे,किरमे, वनकर, असे असून सुद्धा मालकांवर का ठाणेदार कारवाई करत नाही कि ठाणेदार साहेबाना कोणचा दबाव किंवा धाक आहे असे समजाला मार्ग नाही. रोज मजुरी करणाऱ्या ना का बर यांनी धारेवर धरले हा प्रश्न निर्माण होतो एके काळी तत्कालीन पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या काळात डाहुले यांनी खूप जास्त प्रमाणात कर्तव्यदक्ष पणा दाखवला होता त्यांनी वर्ध्यातील मोठ मोठया वाळू माफिया वर कायद्याचा शिकंज्या कसला होता आता त्या कर्तव्यदक्ष पणा ला लक्ष्मी दर्शन तर झाले नाही ना असे समजावे का? हा प्रश्न पडतो.
???? दारू सट्टा चा महापूर कोणाच्या आशीर्वादाने ????

अल्लीपूर ठाणे अंतर्गत येणाऱ्या कानगावात तळेगाव अल्लीपूर या ठिकाणी खुप मोठया प्रमाणात अवैध धंदे सुरु आहे असे असताना साहेबा चा कर्तव्यदक्ष पणा कुठे जातो? कानगावात तर *लडी* नामक इसम खुले आम दारू विक्री चा व्यवसाय करतो पण साहेबाना या बाबत माहिती आहे कि नाही कि यांचा कर्तव्यदक्ष पण हा फक्त तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्या बददली नंतर कमी झाला का? साहेब आपण कर्तव्यदक्ष आहात हे बरोबर पण रोज मजुरी करणाऱ्या ट्रक चालकांचे पोट हे 500 ते 600 रुपयाच्या रोज मजुरी वर चालते त्यांना आपला हिसका दाखवून पैशाने धाकड असलेल्या ट्रक मालकांना का आपण थारा दिला हे समजायला मार्ग नाही.
क्रमशः३
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3261
Total views : 4945