How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी उपयुक्त – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी.

विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी उपयुक्त – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी.

 हिंगणी येथे ॲग्रीस्टॅक शिबिराचे उद्घाटन.
 विविध योजनेच्या लाभाचे वितरण.
 अंगणवाडी, शाळा, पीएचसी, तलाठी कार्यालयाची पाहणी.


वर्धा दि. 21 : केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक या महत्वकांक्षी योजनेंतर्गत देशातील प्रत्येक शेतक-यांना फार्मर आयडी देण्यात येत असून या फॉमर आयडीच्या माध्यमातुन शेतक-यांच्या शेतीविषयक इत्यंभूत माहितीचे संकलन शासनाकडे राहणार आहे. सोबतच शासनाच्या विविध येाजनेचा लाभ देण्यासाठी हा फार्मर आयडी शेतक-यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज हिंगणी येथे आयोजित ॲग्रीस्टॅक शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.

आपल्या घरी सोलर लावण्या करिता संपर्क करा..9511796640


आज हिंगणी येथे ॲग्रीस्टॅक नोंदणी शिबिर व शेतक-यांशी संवाद कार्यक्रमाचे करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार मलीक विराणी, हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे, आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनेच्या लाभाची रक्कम शेतक-यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येत असल्यामुळे शेतक-यांना हा फार्मर आयडी उपयुक्त ठरणार आहे. नागपूर विभागात आतापर्यंत पी एम किंसान योजनेच्या 14 लाख शेतक-यांपैकी 10 लाख शेतक-यांचे ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली असल्याचे विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी सांगितले. इतर शेतक-यांनी लवकरात लवकर ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी असेही त्या म्हणाल्या.
यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, ई-शिधापत्रक, ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रमाणपत्र, प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत शेतकरी बचत गटांना ट्रॅकटरचे चावी देऊन वितरण व कृषि साहित्याचे वितरण तसेच ग्रामपंचायतीतील 5 टक्के दिव्यांग निधीच्या धनादेशाची वितरण करण्यात आले.
शिबिरामध्ये लावण्यात आलेल्या ॲग्रस्टॅक नोंदणी स्टॉलला विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधून शेतक-यांना फॉर्मर आयडी बाबत माहिती समजावून सांगितली. त्याचबरोबर ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याबाबत येणा-या तांत्रिक अडचणी संदर्भात तलाठी यांच्याशी संवाद साधला.
आयुक्तांनी दिल्या तलाठी कार्यालय,
अंगणवाडी, प्राथमिक शाळा, पीएचसीला दिल्या भेटी
राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या 7 कलमी कृति आराखड्या अंतर्गत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सेलू तालुक्यातील हिंगणी येथील तलाठी कार्यालय, अंगणवाडी केंद्र क्रमांक 137, प्राथमिक केंद्र शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली व आवश्यक सुचना यावेळी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
तलाठी कार्यालयास भेट देऊन ग्राम महसुल अधिकारी राहुल खंडारे यांना फेरफार प्रलंबित राहणार नाही, ॲग्रीस्टॅकची नोंदणी 100 टक्के करण्याचे प्रयत्न करावे यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असल्यास कळवावे. महसूल वसुली 100 टक्के करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, त्याचबरोबर कार्यालयामध्ये दर्शनी भागावर फलक लावण्याच्याही सुचना यावेळी विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात. तसेच यावेळी ग्राम पंचायत कार्यालयाला सुध्दा भेट देऊन सरपंच, ग्राम पंचायत अधिकारी यांचेशी संवाद साधून ग्रामपंचायतीच्या अडचणी जाणून घेतल्या.
अंगणवाडीला भेट देऊन कामकाजाचा घेतला आढावा
आयुक्तांनी अंगणवाडीला भेट देऊन अंगणवाडील चिमुकल्या मुलांशी संवाद साधला. चिमुकल्या मुलांनी सुध्दा आपले संपूर्ण नाव जिल्ह्यासह राजयाचे नाव सांगितल्याबद्दल मुलांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी पोषण ट्रॅकरची तपासणी केली. सर्व अंगणवाडीच्या ऑनलाईन डेटाची तपासणी सुध्दा केली. मुलांची नियमित वजन तपासणी करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी जाणून घेतली. मुलांना चांगल्या प्रतीचा आहार मिळत असल्याची खात्री केली. तसेच अंगणवाडी सेविका यांच्या अडचणी बाबत विचारणा सुध्दा केली.
प्राथमिक कन्या शाळेस भेट
जि प प्राथ कन्या शाळा हिंगणी येथे विजयलक्ष्मी बिदरी यांनी भेट देऊन वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले असता सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नांची अचुकपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले. शाळेच्या वेळापत्रकाविषयी व दप्तरमुक्त शनिवार विषयी माहिती विचारली असता शिक्षणाधिकारी व शाळेतील शिक्षक यांनी संपुर्ण माहिती दिली. तसेच शाळेचा पट १३४ असुन पाच शिक्षक कार्यरत आहेत असे सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संभाषण कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होण्यासाठी समाज सहभागाच्या माध्यमातुन गावातील शिक्षीत तरुणांचा सहभाग घेऊन त्यांचेकडुन विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचे मार्गदर्शन उपलब्ध करुन घ्यावे जेणेकरुन त्यांचा इंग्रजी भाषेचा अधिक गतीने व परिपूर्ण विकास होईल अशा प्रकारच्या सुचना त्यांनी दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव चिन्ह देऊन कौतुक केले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. नितु गावंडे यांनी त्यांचे स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी जयपाल राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता महाकाळकर, केंद्रप्रमुख चंदा डायगव्हाणे व शाळेचे मुख्याद्यापक इंगोले व इतर चार शिक्षक उपस्थित होते.
नव्याने सुरु झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पुढील महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याच्या सुचना देऊन शल्य चिकित्सा कक्ष आणि प्रसुती कक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्व साहित्य आणि उपकरणे पुरविण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात.
वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी शासकीय निवास इमारतीचे विद्युतीकरण त्वरित करावे असे सांगून सर्व प्रलंबित ना हरकत प्रमाणपत्र प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करावे असेही त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रा बाबत माहिती त्यांना दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीयअधिकारी डॉ. मयुर नागमोते व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This