How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » शासकीय कंत्राटदारांचा शासन विरोधात जाहीर निषेध.

शासकीय कंत्राटदारांचा शासन विरोधात जाहीर निषेध.

????दोन वर्षां पासूनचे थकीत देयक देणार का नाही या करिता कंत्राटदार रस्त्यावर उतरले.
????15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा.
????शासन व कार्यकारी अभियंत्या वर कंत्राटदारांचा रोष.

वर्धा :सार्वजनिक बांधकाम
विभाग वर्धा येथील शासकीय कंत्राटदार संघटने ने आजपासून कामबंद ठेवण्याचा पवित्रा आजमावला आहे. शासनाकडे निधी नसल्याने व थकीत देयके शासनाने न दिल्याने कंत्राटदार त्रस्त झाल्याचे त्यानी समाज माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. सविस्तर असे कि कंत्राटदाराची मागील दोन वर्षां पासून शासनाने निधी वितरित न केल्यामुळे जिल्ह्यातील कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती ढासाळली असून त्यामुळे त्याच्यावर व त्यांच्या परिवारावर आर्थिक दुर्बल होण्याची परिस्थिती येणाऱ्या काळात होऊ शकते असे असताना. एका कंत्राटदाराने तर चक्क 15 आगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तसेंच कंत्राटदार संघटनेच्या वतीने राज्य शासन व कार्यकारी अभियंता यांचा जाहीर निषेध करत यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा बाजी करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष किशोर मिटकरी व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष अजय घवघवे यांनी दिला.


जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा,आर्वी
६५० कोटीचे कंत्राटदाराची देयके प्रलबीतं आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन योजनेत ४०कोटीची देयके प्रलबीतं आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सिचंन विभागाची
२० कोटीची देयके प्रलबीतं आहे.
कंत्राटदारानी जलजीवन मिशन,जिल्हा परिषद सिंचन विभाग,सार्वजनिक बांधकाम वर्धा, आर्वी, जिल्ह्यातील सर्वं विकास कामे पूर्णतःत्व वर करुन घेतली व कंत्राटदारांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही.
जिल्ह्यातील कंत्राटदारानी बँक मार्फत रोड बांधकाम करिता लागणारे यंत्र घेण्यासाठी कर्ज उचलेले असून बँकेचे हफते भरु शकत नसल्याने काही कंत्राटदारानी घेतलेल्या यंत्रावर जप्ती ची कार्यवाही होत आहे.अशी दयनीय अवस्था सध्या जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारावर झाली आहे.
जिल्ह्यातील कंत्राटदारांनी आज गुरुवार ७-८-२५ रोजी जिल्ह्यातील सार्वजनिक बाधंकाम उपविभाग येथे
आर्वी,कारंजा,आष्टी, हिगंणघाट, पुलगाव,वर्धा. इत्यादी
आपल्या देयकाच्या मागण्यासाठी शासनाचा निषेध नोंदवत आपला संताप व्यक्त केला आहे.उपस्थित कंत्राटदारामध्ये
प्रल्हाद मोटवानी,पुरषोत्तम अग्रवाल, सजंय सातपुरे, अशोक निचत ढोले, प्रविण काकडे,
दर्शन भटटड, सोहेल खान,
मंगेश जगताप,संदिप ताकसांडे, अवधुत मोने,शारिक अली, वैभव चंदनखेडे , सागर मुदडां,बबलू भिसे,सुभाष निखाडे,
रोहीत आस्कर,
बाळु शिंदे,संदिप डेहने, शिवराज शिंदे, विशाल व्यास, अशोक चंदनखेडे, प्रमोद चव्हाण,रणजित मोडक, विशाल वाट,राजु निखाते,अरविदं कोकाटे, नागेश सरदार,बाबा झाकीर, फिरोज शेख,.सारगं चोरे,चदुं होरे, पिटु सातपुते,अमर राठोड, विजय घवघवे,चदुं डफ,
आकाश अवथळे,प्रशांत धोटे,रमेश भगत,विशाल शेंडे ,सुधीर आठवले, रसिद शेख,हेमतं नरहर शेट्टीवार,सुरेश दातीर,निरजंन शर्मा,सुधीर भुते, मोहीत चांडक,वैभव कलंबे, तेलराधे,स्वप्नील कामडी,पारस माळोदे,प्रणय मानकर, भानुदास मुन, राजु ठाकरे, तुषार मुंदडा, अरविंद निकोसे,. प्रविन काकडे,
महेंद्र ठाकुर,राजेश शर्मा,
समाधान पाटील, राष्ट्रपाल गणविर,राजु झाडे,गुजसिगं चव्हाण,
अमोल क्षिरसागर,विराज शिंदे आसिफ पठाण, दिपक पागुंळ,विनोद चव्हाण,संजय नंदनवार,
राजेश हाडोळे,अविनाश पोळ,अजय पाल, गिरोटीजी,सारगं ढगे, आदी शासकीय कंत्राटदार आंदोलनात उपस्थित होते.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This