How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » सघन कपाशी लागवड व रब्बी हंगाम नियोजन मार्गदर्शन

सघन कपाशी लागवड व रब्बी हंगाम नियोजन मार्गदर्शन

शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभे दरम्यान किसान गोष्टी कार्यक्रमा चे आयोजन

वर्धा : डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा स्थापित शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या सभे दरम्यान किसान गोष्टी कार्यक्रम हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील प्रगतीशील शेतकरी श्री. दिलीप पोहाणे यांच्या शेतावर कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग यांच्या संयुक्ताने आयोजीत करण्यात आला.
या प्रसंगी विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ येथील सहयोगी संशोधन संचालक (मध्य विदर्भ विभाग) डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी जमीनिची तयारी कशी करावी, कपाशी पिक व्यवस्थापनास लागणारा खर्च व विक्री व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जिवन कतोरे यांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन कशा पद्धतीने घेता येते व त्याचा फायदा याविषयी विस्तृत माहिती देत रबी हंगामातील पिक व्यवस्थापना बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या दरम्यान आत्माच्या उपप्रकल्प संचालक कु राणी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांनी सघन कपाशी पिकाची पाहणी करण्यात आली. उपविभागीय कृषि अधिकारी, (हिंगणघाट) श्री. स्वप्नील तोरणे यांनी रबी हंगामा दरम्यान घ्यावयाची काळजी या विषयी तर तालुका कृषि अधिकारी (हिंगणघाट) श्री. एस.डी. सुतार यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील विषयतज्ञ (कृषिविद्या) डॉ. रुपेश झाडोडे यांनी कपाशी पिकातील खत व्यवस्थापना विषयी तर विषयतज्ञ (पिक संरक्षण) डॉ. निलेश वझिरे यांनी कपाशी पिकातील कीड व रोग नियंत्रण बाबतीत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सविता पवार, विषयतज्ञ (कृषि अभियांत्रिकी) यांनी बिबिएफ लागवड तंत्रज्ञान व टोकन यंत्राचे फायदे विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. ए.एन.देवतळे यांनी केले. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सभासद व प्रगतीशील शेतकरी श्री. प्रीतम कडू यांनी स्वीट कॉर्न लागवड विषयी मार्गदर्शन केले.
सघन पद्धतीने कपाशी पिक लागवड करणारे व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. दिलीप पोहाणे यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याकरिता उपयोगी तंत्रज्ञान विषयी त्यांचा अनुभव इतर शेतकरी बांधवाना सांगितला. या प्रसंगी सौ अर्चना व श्री दिलीप पोहाणे या उभायंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या दरम्यान कृषि संशोधन केंद्र, कुटकी येथील कृषिविद्यावेत्ता डॉ. मगरे, श्री. राम बावकर, उप कृषि अधिकारी (वडनेर), माजी सरपंच (दारोडा) श्री. प्रशांत घवघवे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रवीण फटिंग, श्री इरफान अली, श्री. अरुण पेटकर, कृषि सहायक श्री. मोहीन शेख, कृषि सेवक श्री. नंदन मिसाळ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री. किशोर उगलमुगले, श्री. गणेश वायरे, कु. ऋतुजा कोरडे, श्री. गजेंद्र, मानकर व ग्रामस्थांनी योगदान दिले. सदर कार्यक्रमास दारोडा, वडनेर, कुटकी, आर्वी, काचगाव, सिरगाव येथील शेतकरी बंधू व शेतकरी महिलांना मान्यवरांच्या हस्ते कापूस वेचणी बॅग वाटप करण्यात आले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This